Sunday, October 13, 2024

खरंच हृदयविकार आहे का त्याचे निदान कसे करावे..??


 

खरंच हृदयविकार आहे का त्याचे निदान कसे करावे..??

पुढील प्रमाणे स्टेप बाय स्टेप तपासणी केली जातात.
1)ECG...

  प्रथमता इसीजी केला जातो....




Step 2nd..
             TMT test ;



ECG नॉर्मल आला तर ट्रेडमिल टेस्ट केली जाते (TMT )त्यालाच ट्रेसस्टेस्ट असे म्हणतात.ज्यामध्ये रुग्णांना सरकत्या पट्टीवरती चालवले जाते व त्याचा वेग क्रमाने वाढवला जातो तो चालत असताना त्याची सतत इसीजी काढला जातो जर हळूहळू चालण्याचा वेग वाढत जातो तस तशी हृदयाची गती पण वाढायला लागते आणि वर्कलोड पण वाढायला लागतो त्यामुळे हृदयाची प्राणवायूची मागणी वाढायला लागते आणि जर का कोरोनरी रक्तवाहिनी मध्ये तर हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा अर्थात प्राणवायू मिळत नाही आणि तो ECG मधून होणाऱ्या बदलांमधून समजून येतो.



Step 3rd..
        Angiography ;



आता तपासणीची तिसरी  पायरी म्हणजेच अँजिओग्राफी

 स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह अली असता काही अपवाद वगळता हृदयाला कमी रक्तपुरवठा आहे आणि हृदयाच्या रक्तवाहिनी मध्ये अडथळा असण्याची शक्यता आहे असा होतो अशावेळी हृदयाच्या रक्तवाहिनी मध्ये नक्की किती अडथळा आहे हे अंजॉग्रफी    करून माहित करून घेता येते तरी या तपासणीमध्ये मांडीच्या किंवा मनगटाच्या शिरेतून कॅथेटर पास केला जातो आणि त्यातून डाय सोडला जातो आणि हृदयाच्या रक्तवाहिनी मधून हा डाय जात असताना त्याचे फोटो घेतले जातात त्यामध्ये हृदयाची रक्तवाहिनी किती टक्के बंद आहे हे समजते.

Step 4th
Angioplasty..



जर का अँजिओग्राफीमध्ये हृदयाची रक्तवाहिनी जास्त प्रमाणात बंद झालेली आहे आणि हृदयाचा त्या भागाचा रक्तपुरवठा कमी झालेला आहे आणि रुग्णाला लक्षणे उत्पन्न होत आहेत असे निष्पन्न झाले तर ही बंद झालेली हृदयाची रक्तवाहिनी अँजिओप्लास्टी करून मोकळी केली जाते आणि त्या ठिकाणी परत बंद होऊ नये म्हणून औषध लावलेली एक प्रकारची स्प्रिंग ज्याला स्टॅन्ड असे म्हणतात की त्या ठिकाणी टाकली जाते त्यामुळे ती रक्तवाहिनी परत बंद होण्याची शक्यता कमी होते बरोबरीने रक्त पातळ होण्याची औषधी चालू ठेवली जातात.

Step 5th
2-D- Echo..




ही तपासणी म्हणजे एक प्रकारची हृदयाची सोनोग्राफी असते त्याद्वारे जर का रुग्णाला हृदयविकाराचा झटका मायो कर्डिले इन्फ्राक्षण आलेला असेल तर तो समजून येऊ शकतो हृदयाच्या ज्या भागाला झटका आलेला आहे त्या ठिकाणचा स्नायू मृत पावतो आणि त्या मृत स्नायू मधून हृदयाची स्पंदने उत्पन्न करणाऱ्या लहरी पिंपल्सेस जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे तो भाग हृदयाच्या इतर भागाप्रमाणे हलत नाही यालाच रिजनल वॉल मोशन एबनॉर्मलिटी असे म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ समुद्राची लाट किनाऱ्याकडे येताना ज्याप्रमाणे एका लईच असते हे झाले नॉर्मल हृदयाचे स्पंदन याउलट एखादा खडक त्या लाटेच्या मध्ये आला तर ती लाट त्या खडकापाशी फुटते आणि नवीन लाट त्यानंतर चालू होते या ठिकाणी खडक म्हणजे मृत पावलेला हृदयाचा स्नायू आणि समुद्राची लाट म्हणजे हृदयाच्या लहरी.



डॉ.कुंडलिक नवले 
        BAMS PGPP (dip.in panchkarm) 
           अग्निकर्म ,विद्धकर्म आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ
                      8600172536                     












































































 

 

1 comment:

खरंच हृदयविकार आहे का त्याचे निदान कसे करावे..??

  खरंच हृदयविकार आहे का त्याचे निदान कसे करावे..?? पुढील प्रमाणे स्टेप बाय स्टेप तपासणी केली जातात. 1)ECG...   प्रथमता इसीजी केला जातो.... S...