तुमचे बाळ सुदृढ होण्यासाठी साजूक आहार !!
- मुलांसाठी आहार- 0 ते 1 वर्ष:
ज्या मुलांची जन्मता वजन कमी असते त्यांना सोने ,तूप ,मध द्यावे सोने घालून उकळलेले पाणी द्यावे.
- जन्म ते सहा महिने:
फक्त आईचे दूध, मूल चार महिन्याचे होईपर्यंत जर आईचे दूध कमी पडत असेल, बाळ रडत असेल वजन वाढत नसेल झोपत नसेल तर गाईचे दूध पुढील एक कप दूध अर्धा कप पाणी सुंठ बारीक तुकडा, विडंग चार दाणे उकळून द्यावे जसे वय वाढत जाईल तसे पाण्याचे प्रमाण कमी करावे.
- 4 महिन्यानंतर:
दूध कमी पडत असल्यास खारीक बदाम जरदाळू प्रत्येकी 30 वेढे मदत उगाळून दिवसातून एक वेळेस द्यावे व बाळाला पेज द्यावी तीन ग्रॅम तांदूळ भाजून 50 मिली पाण्यात तांदूळ फुटेपर्यंत मऊ शिजवावे व त्याचे वरचे पाणी काढून मीठ साखर तूप घालून द्यावे.
- आठव्या व नवव्या महिन्यानंतर:
- दहाव्या महिन्यानंतर:
आहाराचे प्रमाण वाढवावे दूध खीर पेज शिरावरण-भात पोळी तूप साखर भाजी आमटी यापैकी काहीही द्यावे.
दात आल्यावर मुलासमोर खाऊ ठेवावा तू बरोबर हाताने उचलून खाऊ तोंडात घालतो या खाऊमध्ये प्रामुख्याने चाळीच्या लाह्या मुरमुरे फुटाणे मनुके बेदाने खारीक भाजलेली डाळ खडीसाखर राजगिरा लाडू गव्हाचा लाडू मुगाचा लाडू शेंगदाणा गुळ द्यावा.
- एक ते दोन वर्ष:
एक ते दोन वर्षात मुलांना परिपूर्ण आहार द्यावा व दूध सुंठ व विडंग टाकून द्यावे मुलांना स्वतःच्या हाताने खाण्यास प्रवृत्त करावे.
- दोन ते तीन वर्ष:
एक ते दोन वर्षात मुलांना परिपूर्ण आहार द्यावा व दुधाचे प्रमाण कमी करावे तसेच स्वतःच्या हाताने खाण्यास प्रवृत्त करावे.
डॉ.कुंडलिक नवले
BAMS PGPP
(dip. In. Panchkarma)
आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ

No comments:
Post a Comment