Thursday, October 3, 2024

माहिती आपल्या हृदयासंबंधीत भाग-1..


हृदयविकाराचा झटका येतो म्हणजे नक्की काय होते ?

  • आपले हृदय हा एक प्रकारचा पंप आहे जो संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा पंपिंगद्वारे करत असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत ७०-८० वर्ष हा पंप अव्याहत चालू असतो. या पंपाला एका क्षणाची सुद्धा उसंत नसते. इतक्या उत्तम दर्जाचा पंप अजून मानवालासुद्धा बनवता आलेला नाही.
  • हा जो हृदयरूपी पंप आहे तो स्नायूंपासून बनलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्या पाण्याच्या पंपाला चालू राहण्यासाठी इंधनाचा पुरवठा गरजेचा असतो त्याच पद्धतीने या हृदयरूपी पंपाला कार्यरत राहण्यासाठी इंधनम्हणून प्राणवायूचा पुरवठा गरजेचा असतो. हा प्राणवायू या हृदयाच्या मांसपेशींना रक्तामार्फत पुरवला जातो.
  • हृदयाच्या आतमध्ये जरी रक्त असले तरीसुद्धा हृदयाला वेगळा रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात त्यांना कोरोनरी आर्टरी असे म्हणतात.

  • दयाच्या आतील रक्त हृदयाच्या मांस पेशी डायरेक्ट वापरू शकत नाहीत. ते या कोरोनरी रक्तवाहिन्या मार्फत हृदयाच्या विविध भागांना पुरवले जाते आणि त्या शुद्ध रक्तामार्फत हृदयाच्या मांसपेशींना प्राणवायूचा पुरवठा होतो.

  • काही कारणाने या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाला (ज्याला सर्वसामान्य लोक ब्लॉकेज असे म्हणतात.) तर या ब्लॉकेजमुळे ती रक्तवाहिनी हृदयाच्या ज्या भागाला रक्तपुरवठा करते त्या भागाला रक्तपुरवठा अपुरा होतो. रक्तपुरवठा अपुरा होतो म्हणजेच हृदयाच्या त्या भागातील मांसपेशींना पुरेसा प्राणवायू मिळत नाही आणि त्यामुळे रुग्णांमध्ये हृदय विकाराची लक्षणे दिसायला लागतात.
  • हा हृदयाच्या रक्तवाहिनी मधील अडथळा कमी प्रमाणात असेल तर रुग्णालास्वस्थ बसलेल्या अवस्थेत कोणताही त्रास जाणवत नाही. केवळ जिने चढायला लागले किंवा जास्त प्रमाणात चालणे झाले किंवा श्रमाची कामे केल्यास दम लागतो किंवा छातीमध्ये सौम्य स्वरूपाच्या वेदना होतात. (Stable Angina) याचे कारण म्हणजे बसलेल्या विश्रांतीच्या अवस्थेमध्ये हृदयाच्या मांसपेशींची प्राणवायूची मागणी जास्त नसते तीं अडथळा असलेल्या रक्तवाहिनीमार्फत सुद्धा पुरी केली जाते. मात्र जेव्हा रुग्ण जिने चढतो किंवा वेगाने चालतो तेव्हा हृदयाचा वेग वाढतो आणि हृदयाच्या मांसपेशींची प्राणवायूची गरज वाढते. जी अडथळा असलेल्या रक्तवाहिनी मार्फत पुरी केली जात नाही आणि रुग्णाला लक्षणे दिसायला लागतात.
  • असा रुग्ण डॉक्टरांना सांगतो... 'डॉक्टर, पूर्वी मी तीन किलोमीटर एका दमात चालायचो. पण आता अर्धा किंवा एक किलोमीटर चाललं तरी छाती भरून येते. दम लागतो आणि बसावे लागते. थोडावेळ बसलो की बरे वाटते आणि परत पुढील अंतर चालता येते.'
  • याला Stable Angina असे म्हणतात. बरेचदा अशा रुग्णांचा ईसीजी काढल्यास तो नॉर्मल येतो कारण विश्रांतीच्या अवस्थेमध्ये त्या रुग्णाच्या हृदयाला अडथळा असलेल्या रक्तवाहिनी मार्फतसुद्धा पुरेसा रक्तपुरवठा होतो.

2 comments:

खरंच हृदयविकार आहे का त्याचे निदान कसे करावे..??

  खरंच हृदयविकार आहे का त्याचे निदान कसे करावे..?? पुढील प्रमाणे स्टेप बाय स्टेप तपासणी केली जातात. 1)ECG...   प्रथमता इसीजी केला जातो.... S...