Sunday, October 13, 2024

खरंच हृदयविकार आहे का त्याचे निदान कसे करावे..??


 

खरंच हृदयविकार आहे का त्याचे निदान कसे करावे..??

पुढील प्रमाणे स्टेप बाय स्टेप तपासणी केली जातात.
1)ECG...

  प्रथमता इसीजी केला जातो....




Step 2nd..
             TMT test ;



ECG नॉर्मल आला तर ट्रेडमिल टेस्ट केली जाते (TMT )त्यालाच ट्रेसस्टेस्ट असे म्हणतात.ज्यामध्ये रुग्णांना सरकत्या पट्टीवरती चालवले जाते व त्याचा वेग क्रमाने वाढवला जातो तो चालत असताना त्याची सतत इसीजी काढला जातो जर हळूहळू चालण्याचा वेग वाढत जातो तस तशी हृदयाची गती पण वाढायला लागते आणि वर्कलोड पण वाढायला लागतो त्यामुळे हृदयाची प्राणवायूची मागणी वाढायला लागते आणि जर का कोरोनरी रक्तवाहिनी मध्ये तर हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा अर्थात प्राणवायू मिळत नाही आणि तो ECG मधून होणाऱ्या बदलांमधून समजून येतो.



Step 3rd..
        Angiography ;



आता तपासणीची तिसरी  पायरी म्हणजेच अँजिओग्राफी

 स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह अली असता काही अपवाद वगळता हृदयाला कमी रक्तपुरवठा आहे आणि हृदयाच्या रक्तवाहिनी मध्ये अडथळा असण्याची शक्यता आहे असा होतो अशावेळी हृदयाच्या रक्तवाहिनी मध्ये नक्की किती अडथळा आहे हे अंजॉग्रफी    करून माहित करून घेता येते तरी या तपासणीमध्ये मांडीच्या किंवा मनगटाच्या शिरेतून कॅथेटर पास केला जातो आणि त्यातून डाय सोडला जातो आणि हृदयाच्या रक्तवाहिनी मधून हा डाय जात असताना त्याचे फोटो घेतले जातात त्यामध्ये हृदयाची रक्तवाहिनी किती टक्के बंद आहे हे समजते.

Step 4th
Angioplasty..



जर का अँजिओग्राफीमध्ये हृदयाची रक्तवाहिनी जास्त प्रमाणात बंद झालेली आहे आणि हृदयाचा त्या भागाचा रक्तपुरवठा कमी झालेला आहे आणि रुग्णाला लक्षणे उत्पन्न होत आहेत असे निष्पन्न झाले तर ही बंद झालेली हृदयाची रक्तवाहिनी अँजिओप्लास्टी करून मोकळी केली जाते आणि त्या ठिकाणी परत बंद होऊ नये म्हणून औषध लावलेली एक प्रकारची स्प्रिंग ज्याला स्टॅन्ड असे म्हणतात की त्या ठिकाणी टाकली जाते त्यामुळे ती रक्तवाहिनी परत बंद होण्याची शक्यता कमी होते बरोबरीने रक्त पातळ होण्याची औषधी चालू ठेवली जातात.

Step 5th
2-D- Echo..




ही तपासणी म्हणजे एक प्रकारची हृदयाची सोनोग्राफी असते त्याद्वारे जर का रुग्णाला हृदयविकाराचा झटका मायो कर्डिले इन्फ्राक्षण आलेला असेल तर तो समजून येऊ शकतो हृदयाच्या ज्या भागाला झटका आलेला आहे त्या ठिकाणचा स्नायू मृत पावतो आणि त्या मृत स्नायू मधून हृदयाची स्पंदने उत्पन्न करणाऱ्या लहरी पिंपल्सेस जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे तो भाग हृदयाच्या इतर भागाप्रमाणे हलत नाही यालाच रिजनल वॉल मोशन एबनॉर्मलिटी असे म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ समुद्राची लाट किनाऱ्याकडे येताना ज्याप्रमाणे एका लईच असते हे झाले नॉर्मल हृदयाचे स्पंदन याउलट एखादा खडक त्या लाटेच्या मध्ये आला तर ती लाट त्या खडकापाशी फुटते आणि नवीन लाट त्यानंतर चालू होते या ठिकाणी खडक म्हणजे मृत पावलेला हृदयाचा स्नायू आणि समुद्राची लाट म्हणजे हृदयाच्या लहरी.



डॉ.कुंडलिक नवले 
        BAMS PGPP (dip.in panchkarm) 
           अग्निकर्म ,विद्धकर्म आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ
                      8600172536                     












































































 

 

Friday, October 11, 2024

तुमचे बाळ सुदृढ होण्यासाठी साजूक आहार !!

 


तुमचे बाळ सुदृढ होण्यासाठी साजूक आहार !! 

  • मुलांसाठी आहार- 0 ते 1 वर्ष:

ज्या मुलांची जन्मता वजन कमी असते त्यांना सोने ,तूप ,मध द्यावे   सोने घालून उकळलेले पाणी द्यावे.

  • जन्म ते सहा महिने:

फक्त आईचे दूध, मूल चार महिन्याचे होईपर्यंत जर आईचे दूध कमी पडत असेल, बाळ रडत असेल वजन वाढत नसेल झोपत नसेल तर गाईचे दूध पुढील एक कप दूध अर्धा कप पाणी सुंठ बारीक तुकडा, विडंग चार दाणे उकळून द्यावे जसे वय वाढत जाईल तसे पाण्याचे प्रमाण कमी करावे.

  • 4 महिन्यानंतर:

दूध कमी पडत असल्यास खारीक बदाम जरदाळू प्रत्येकी 30 वेढे मदत उगाळून दिवसातून एक वेळेस द्यावे व बाळाला पेज द्यावी तीन ग्रॅम तांदूळ भाजून 50 मिली पाण्यात तांदूळ फुटेपर्यंत मऊ शिजवावे व त्याचे वरचे पाणी काढून मीठ साखर तूप घालून द्यावे.

  • आठव्या व नवव्या महिन्यानंतर: 

बाळ बसू लागल्यास त्याला बसूनच द्यावे मऊ वरण भात द्यावे तुपातील शिरा उपमा नाचण्याची खीर राजगिरा खीर मुगाच्या डाळीची खिचडी कमी तिखट द्यावी.

  • दहाव्या महिन्यानंतर:

आहाराचे प्रमाण वाढवावे दूध खीर पेज शिरावरण-भात पोळी तूप साखर भाजी आमटी यापैकी काहीही द्यावे.

दात आल्यावर मुलासमोर खाऊ ठेवावा तू बरोबर हाताने उचलून खाऊ तोंडात घालतो या खाऊमध्ये प्रामुख्याने चाळीच्या लाह्या मुरमुरे फुटाणे मनुके बेदाने खारीक भाजलेली डाळ खडीसाखर राजगिरा लाडू गव्हाचा लाडू मुगाचा लाडू शेंगदाणा गुळ द्यावा.

  • एक ते दोन वर्ष:

एक ते दोन वर्षात मुलांना परिपूर्ण आहार द्यावा व दूध सुंठ व विडंग टाकून द्यावे मुलांना स्वतःच्या हाताने खाण्यास प्रवृत्त करावे.

  • दोन ते तीन वर्ष:

एक ते दोन वर्षात मुलांना परिपूर्ण आहार द्यावा व दुधाचे प्रमाण कमी करावे तसेच स्वतःच्या हाताने खाण्यास प्रवृत्त करावे.


         डॉ.कुंडलिक नवले    
          BAMS PGPP  
  (dip. In. Panchkarma) 
     आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ



सुवर्णप्राशन - बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी एक संजीवनी !!


सुवर्णप्राशन - बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी एक संजीवनी !! 

सुवर्णप्राशन म्हणजे काय ?

  • सुवर्णप्राशन आयुर्वेदिक 16 संस्कारांपैकी एक संस्कार आहे.
  • बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी बनवलेले औषध आहे.

सुवर्ण प्राशन यातील प्रमुख औषधे: 

  • सुवर्ण भस्म- सोने उत्तम विषघ्न, मेध्य, बल्य.
  • ब्राह्मी घृत- ब्राह्मी बुद्धीवर्धक,स्मरणशक्ती वाढवणारे.
  • तूप- बालकाच्या सर्वांगीण वाढीकरिता उपयुक्त.
  • मध- कफ़घ्न आहे.

सुवर्णप्राशन देण्याचे वय 0 ते 16 वर्ष

सुवर्णप्राशनचा डोस कसा द्यावा ?

  • दर पुष्य नक्षत्रावर.  
              किंवा 
  • दररोज सकाळी वयानुसार मात्रा द्यावी. 

सुवर्णप्राशनचे फायदे:

  • स्मरणशक्ती बुद्धी वाढवणे. 
  • प्रतिकारक शक्ती वाढवणे. 
  • मनोबल वाढवणे. 
  • औषधांचे साईड इफेक्ट्स दूर करणे. 
  • भुकेच्या तक्रारी दूर करणे.

                            डॉ.कुंडलिक नवले
                             BAMS PGPP 
                     (dip. In. Panchkarma) 
                         आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ

Thursday, October 3, 2024

माहिती आपल्या हृदयासंबंधीत भाग-1..


हृदयविकाराचा झटका येतो म्हणजे नक्की काय होते ?

  • आपले हृदय हा एक प्रकारचा पंप आहे जो संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा पंपिंगद्वारे करत असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत ७०-८० वर्ष हा पंप अव्याहत चालू असतो. या पंपाला एका क्षणाची सुद्धा उसंत नसते. इतक्या उत्तम दर्जाचा पंप अजून मानवालासुद्धा बनवता आलेला नाही.
  • हा जो हृदयरूपी पंप आहे तो स्नायूंपासून बनलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्या पाण्याच्या पंपाला चालू राहण्यासाठी इंधनाचा पुरवठा गरजेचा असतो त्याच पद्धतीने या हृदयरूपी पंपाला कार्यरत राहण्यासाठी इंधनम्हणून प्राणवायूचा पुरवठा गरजेचा असतो. हा प्राणवायू या हृदयाच्या मांसपेशींना रक्तामार्फत पुरवला जातो.
  • हृदयाच्या आतमध्ये जरी रक्त असले तरीसुद्धा हृदयाला वेगळा रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात त्यांना कोरोनरी आर्टरी असे म्हणतात.

  • दयाच्या आतील रक्त हृदयाच्या मांस पेशी डायरेक्ट वापरू शकत नाहीत. ते या कोरोनरी रक्तवाहिन्या मार्फत हृदयाच्या विविध भागांना पुरवले जाते आणि त्या शुद्ध रक्तामार्फत हृदयाच्या मांसपेशींना प्राणवायूचा पुरवठा होतो.

  • काही कारणाने या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाला (ज्याला सर्वसामान्य लोक ब्लॉकेज असे म्हणतात.) तर या ब्लॉकेजमुळे ती रक्तवाहिनी हृदयाच्या ज्या भागाला रक्तपुरवठा करते त्या भागाला रक्तपुरवठा अपुरा होतो. रक्तपुरवठा अपुरा होतो म्हणजेच हृदयाच्या त्या भागातील मांसपेशींना पुरेसा प्राणवायू मिळत नाही आणि त्यामुळे रुग्णांमध्ये हृदय विकाराची लक्षणे दिसायला लागतात.
  • हा हृदयाच्या रक्तवाहिनी मधील अडथळा कमी प्रमाणात असेल तर रुग्णालास्वस्थ बसलेल्या अवस्थेत कोणताही त्रास जाणवत नाही. केवळ जिने चढायला लागले किंवा जास्त प्रमाणात चालणे झाले किंवा श्रमाची कामे केल्यास दम लागतो किंवा छातीमध्ये सौम्य स्वरूपाच्या वेदना होतात. (Stable Angina) याचे कारण म्हणजे बसलेल्या विश्रांतीच्या अवस्थेमध्ये हृदयाच्या मांसपेशींची प्राणवायूची मागणी जास्त नसते तीं अडथळा असलेल्या रक्तवाहिनीमार्फत सुद्धा पुरी केली जाते. मात्र जेव्हा रुग्ण जिने चढतो किंवा वेगाने चालतो तेव्हा हृदयाचा वेग वाढतो आणि हृदयाच्या मांसपेशींची प्राणवायूची गरज वाढते. जी अडथळा असलेल्या रक्तवाहिनी मार्फत पुरी केली जात नाही आणि रुग्णाला लक्षणे दिसायला लागतात.
  • असा रुग्ण डॉक्टरांना सांगतो... 'डॉक्टर, पूर्वी मी तीन किलोमीटर एका दमात चालायचो. पण आता अर्धा किंवा एक किलोमीटर चाललं तरी छाती भरून येते. दम लागतो आणि बसावे लागते. थोडावेळ बसलो की बरे वाटते आणि परत पुढील अंतर चालता येते.'
  • याला Stable Angina असे म्हणतात. बरेचदा अशा रुग्णांचा ईसीजी काढल्यास तो नॉर्मल येतो कारण विश्रांतीच्या अवस्थेमध्ये त्या रुग्णाच्या हृदयाला अडथळा असलेल्या रक्तवाहिनी मार्फतसुद्धा पुरेसा रक्तपुरवठा होतो.

Tuesday, October 1, 2024

आपल्या पाल्याची उंची वाढवूया आयुर्वेद पद्धतीने..

                  आपल्या पाल्याची उंची वाढवूया आयुर्वेद पद्धतीने..






उंची न वाढण्याची कारणे कोणती  ??
1) बरेचसे बालकांना योग्य ती पोषक तत्वे न मिळाल्या कारणाने शरीरातील विविध धातूंचे योग्य ते पोषण होत नाही.
2) लहान बालकांना गोड खाण्याची सवय असल्याने शरीरामध्ये जंत झाल्या कारणाने सुद्धा योग्य ती शरीराची वाढ होत नाही.
3) बालकांना बाहेरचे ब्रेड बिस्कीट मॅगी चिप्स इत्यादी खाण्याची सवय असल्याकारणाने सुद्धा शरीराचे योग्य पोषण होत नाही.
4) मुलींमध्ये मासिक पाळी संबंधित विविध तक्रारीमुळे सुद्धा उंची वाढत नाही.
5) आपले बालक वारंवार आजारी पडत असल्याकारणाने सुद्धा उंची वाढत नाही.

उंची वाढवण्याची वयोमर्यादा किती आहे ?? 

3 तीन वर्षापासून वयाच्या 24 वर्षापर्यंत फायदा होतो.
उंची वाढण्यासाठी योग्य काळ कोणता ?? 
 उंचीसाठी चिकित्सा विशेषता नवरात्रीपासून मकर संक्रातीपर्यंत केली जाते.
आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने चिकित्सा केली जाते ?
आयुर्वेदामध्ये सप्तधातूंचा म्हणजेच रस रक्त मास मेद असती मज्जा शुक्र यांचा विचार केला जातो  व त्या अनुरूप ज्या ठिकाणी अस्थिधातूचे योग्यरीत्या पोषण होत नाही त्या ठिकाणी  विविध प्रकारचे अभ्यंतर औषधी दिली जातात. 
योग्य प्रकारचे व्यायाम. 
आहारविषयक योग्य मार्गदर्शन. 
या औषधींची काही साईड इफेक्ट्स आहेत का ?? 
तर उत्तर आहे बिलकुल नाही ही औषधी घेतल्या कारणाने शरीराला काहीही अपाय न होता खूप चांगला फायदा होतो. 
हा कोर्स किती दिवसाचा करावा लागतो 
साधारणता 3 महिने ही औषधी दिली जातात. 
                                                                            
                                                                                                       डॉ.कुंडलिक नवले   
                                                                                                         BAMS PGPP    
                                                                                             ( dip. In panchkarma,pune ) 
                                                                                    अग्निकर्म,विद्धकर्म ,आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ
                                                                                                            8600172536

खरंच हृदयविकार आहे का त्याचे निदान कसे करावे..??

  खरंच हृदयविकार आहे का त्याचे निदान कसे करावे..?? पुढील प्रमाणे स्टेप बाय स्टेप तपासणी केली जातात. 1)ECG...   प्रथमता इसीजी केला जातो.... S...